नवी दिल्ली - हेल्मेट परिधान करून बाईकवरून प्रवास करणाऱ्या एका श्वानाचा फोटो सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या फोटोने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या दंडात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच हेल्मेट परिधान करून बाईकवर मागे बसलेल्या या श्वानाचा फोटो नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय झाला आहे.
प्रेरणा सिंग बिंद्रा या महिलेने आपल्या ट्विटर अकाउंटवरून श्वानाचा हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याचे कौतुक देखील केले आहे. संरक्षण नियमांचे पालन करणाऱ्या श्वानाचे कौतुकच आहे. मात्र दिल्लीकरांनी त्याच्याकडून काहीतरी शिकावे असे ट्विट कुणाल नावाच्या एका तरुणाने केले आहे. नव्या मोटार वाहन कायद्यामुळे दंडाची रक्कम वाढली आहे. त्यामुळेच नागरिकांची धास्ती वाढल्याने हे उदाहरण पाहायला मिळाल्याचं काहींनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे.
नखं कापत असताना कुत्र्याने असं काही केलं की, व्हिडीओ झाला व्हायरल
कुत्रा आणि त्याच्या प्रामाणिकपणाबबात आपण अनेक गोष्टी ऐकतो. पण तुम्हाला माहीत आहेत का? हे ड्रामा करण्यातही फार हुशार असतात बरं... असं आम्ही नाही तर टिकटॉकवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून दिसून येत आहे. टिक टॉकवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी आपली कुत्र्याची नखं कापत आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? अहो... या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही कुत्र्याचे एक्सप्रेशन पाहा. एवढी नाटकं कदाचितच कोणी करत असेल. जसजशी मुलगी नेलकटर नखं कापण्यासाठी कुत्र्याच्या पायाजवळ घेऊन जाते. तसतशे कुत्र्याचे एक्स्प्रेशन्स बदलत जातात. एवढचं नाहीतर हा ड्रामेबाज नंतर खालीच पडतो. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत 5.8 मिलियन्सपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर करत फार फनी कॅप्शन दिलं आहे.
वाघ बंधूंना आवडली नूर; पण भांडण पाहून 'ती' गेली दूर
राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघांचा एकमेकांशी भांडतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आयएफएस अधिकारी प्रवीन कासवान यांच्यानुसार, वाघ टी57 आणि टी58 आहेत. कासवान यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आणि या दोन वाघांच्या भांडणाला क्रूर आणि हिंसक लढाई असं सांगितलं. रणथंबोर गाइड्सनुसार, टी57चं नाव सिंगस्थ आणि टी58चं नाव रॉकी आहे. हे दोघेही भाऊ आहेत आणि जयसिंघपुरा क्षेत्रातील वाघिण शर्मीलीची मुलं आहेत. व्हिडीओ शेअर केल्यानंतर कासवान यांना सांगितलं की, हे दोघं भाऊ टी 39 नंबरची वाघिण जिचं नाव नूर आहे. तिच्यासाठी एकमेकांशी भांडत आहेत. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दोघं वाघ भांडत आहेत आणि झाडामध्ये एक वाघीण उभी आहे. पम या दोघांमधील भांडणं वाढल्यानंतर वाघिण तिथून पळून जाते. व्हायरल होणारा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर 24 हजारांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. तसेच अनेक कमेंट्सही आहेत. कासवान यांनी सांगितले की, वाघांच्या या लढाईमध्ये टी57 जिंकला असून यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही.