डोंगराळ भागात देशातील सर्वात धोकादायक असे रस्ते आहेत. या रस्त्यांवर कार, बस किंवा ट्रक चालवणे मुलांचा खेळ नाही. कारण या रस्त्यांवर चांगल्या चांगल्या ड्रायव्हर्सचा कॉन्फिडन्स कमजोर होतो. हिमाचलमधील अनेक धोकादायक रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एक ताजा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ड्रायव्हरचा मनात धडकी भरवणारा कारनामा बघायला मिळतो.
हा व्हिडीओ १६ डिसेंबरला इनक्रेडीबल हिमाचल या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला होता. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक भरभरून कमेंट करत आहेत. व्हिडीओत बघू शकता की, डोंगरातील छोट्या रस्त्यावर कशाप्रकारे ड्रायव्हर बस टर्न करतो. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी अशातही हे त्याने कसं केलं हे बघताना धडकी नक्की भरते.
मुळात हा व्हिडीओ यूट्यूब चॅनल Onkar Malushte ने १७ जुलैला शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, उदयपूर हिमाचल प्रदेशापासून १२ किलोमीटर दूर केलांग-किलरचा आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ९ लाख ६७ हजार व्ह्यूज आणि १२ हजार लाइक्स मिळाले आहेत.