उद्या ९ मार्च रोजी भारतभर हा होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार. आपल्यासोबत आपल्याच जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा हा सण आनंद आणि सुख घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल. हा तुमचा विचार तुमच्या त्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तींपर्यंत पोचवायचा असेल तर त्यासाठी त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देणं एकदम सोपं आहे.
सध्या प्रत्यक्ष भेटून दिलेल्या शुभेच्छांच्या इतकेच डिजिटल शुभेच्छांना सुद्धा महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे, तुम्हाला सुद्धा जर का, Whatsapp Status, Facebook Images किंवा अन्य सोशल मीडिया मार्फत शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हे काही अस्सल मराठमोळे मॅसेज, शुभेच्छापत्रं पाठवून तुम्ही पाठवून होळीचा सण साजरा करू शकता.
लाल रंग तुमच्यासाठी गालांसाठीकाळा रंग तुमच्या केसांसाठीनिळा रंग तुमच्या डोळ्यांसाठीपिवळा रंग तुमच्या हातांसाठीगुलाबी रंग तुमच्या होठांसाठीपांढरा रंग तुमच्या मनासाठीहिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठीहोळीच्या या सार रंगांसोबततुमचे जीवन रंगून जावो...हार्दिक शुभेच्छा
भिजू दे रंग अन् अंग स्वछंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग...
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग...
रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा.
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…
ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
होळीच्या अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांति नांदो.
होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
फाल्गुन मासी आली होळी
खायला मिळणार पुरणाची पोळी
रात्री देऊ मनसोक्त आरोळी
राख लावूनी आपल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.( हे पण वाचा-Holi special : थंडाई, पुरणपोळी, गुजीया; होळीला 'हे' खास पदार्थ कराल तर घरातले म्हणतील वाह बढीया!)
रंग प्रेमाचा
रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा
रंग बंधाचा
रंग हर्षाचा
रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.( हे पण वाचा-Holi special : रंगांनी खेळताना आजारांपासून बचाव करायचा असेल तर वापरा 'या' खास टीप्स)