माणूसकीचे दर्शन घडवणारे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुपरमार्केटमध्ये चष्मा साफ करायचं काम करत असलेल्या माणसाकडे स्वतःला चष्मा विकत घेता येईल इतकेही पैसे नव्हते. अचानक एका गृहस्थाने या माणसाची मदत केली आणि त्याचे नशिब चमकले. तुमचा विश्वास बसणार नाही पण एका सद्गृहस्थानं मदत म्हणून ३५ हजार रूपये दिले आहेत.
सोशल मीडियावर या फोटोमधील माणूस सुपरमार्केटमध्ये चष्मा साफ करण्याचे काम करत होता. कारण या माणसाला स्वतःला चष्मा बनवण्यासाठी पैश्यांची गरज होती. हा माणूस सर्वत्र बोर्ड घेऊन फिरत होता. या बोर्डवर लिहिले होते की, 'मी काच साफ करण्याचे काम करतो मला चष्मा बनवून घेण्यासाठी पैश्याची गरज आहे.' काहीवेळ काम करून या माणसानं ११ डॉलर रूपये जमवले. New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१
चष्मा साफ करणाऱ्या या माणसाची कहाणी ऐकल्यानंतर एका सद्गृहस्थानं मदतीचा हात दिला. या माणसाला तब्बल ५०० डॉलर्सची मदत केली. म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे ३५ हजार रूपये मदत म्हणून दिले. इतकी मोठी रक्कम हातात आल्यानंतर या माणसाला अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्याने ज्या व्यक्तीनं पैसे दिले त्याला मीठी मारली. हा व्हिडीओ कुठला आहे. याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...