सोशल मीडियावर दररोज हत्तींचे आणि अन्य प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ गुवाहाटीच्या लष्करी कॅम्पमधून व्हायरल झाला आहे, यामध्ये एका हत्तीने बाईकच्या आरशावर टांगलेले हेल्मेट फळ समजून खाल्ले आहे. (Elephant Ate helmet in guwahati)
हेल्मेट खरेदीवेळी या गोष्टी नक्की पहा; दंड तर वाचेलच पण...
गुवाहाटीच्या आर्मी कॅम्पमध्ये एक हैरान करणारी घटना घडली. जंगली हत्तीने फळ समजून बाईकवरील हेल्मेट सोंडेने उचलून तोंडात घातले. अमचांग वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात नेहमी हत्ती खाण्याच्या उद्देशाने फिरत असतात. असाच एक जंगली हत्ती सैन्याच्या कॅम्पमध्ये घुसला होता. रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले होते. या बॅरिकेडजवळ एक मोटारसायकल उभी करण्यात आली होती. या मोटारसायकलवर हेल्मेट ठेवण्यात आले होते. बहुतेक हत्तीपासून वाचण्यासाठी तो मोटारसायकलस्वार आणि आणि अन्य तिथेच बाजुला होऊन व्हिडीओ काढत होते. ते बाईकवरील हेल्मेट हत्तीने सोंडेद्वारे तोंडात घातले आणि पुढे निघून गेला.
पुढे हत्तीने ते हेल्मेट खाता येत नाही म्हणून पुन्हा खाली टाकले की ते आयएसआय मार्कचे नसल्याने तोंडात तुकडे तुकडे झाले ते समजू शकले नाही.