प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमीच शब्दाचा आधार घ्यायला हवा असं काही नाही. काहीवेळा अबोल प्रेमाची कथा काही वेगळीच असते. प्रेम आणि आपलेपणा व्यक्त करण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीनं संगीताचा आधार घेतला आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या आजोबांनी रुग्णालयाच्या बाहेर येऊन वाद्य वाजवायला सुरूवात केली आहे. या आजोबांची कहाणी वाचून तुम्हालाही भरून येईल. यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या आजोबांची पत्नी रुग्णालयात उपचार घेत असताना तिची भेट घेण्यासाठी रुग्णालयानं नाकारलं. त्यावेळी काही क्षण निराश झालेले आजोबा काहीवेळानंतर वाद्य घेऊन आले. आपलं पत्नीवर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी या आजोबांनी चक्क रुग्णालयाबाहेर रस्त्यावर बसून वाद्य वाजवण्यास सुरुवात केली.
ही घटना इटलीमधील कॅस्टेल सॅन जिओव्हानी शहरात घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तीनं वाजवलेल्या वाद्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो अनेक युझर्सनी पसंत केला आहे. या व्यक्तीच्या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. Diwali 2020 : लय भारी! फ्रान्सच्या नागरिकांनी चक्क मराठीत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा व्हिडीओ
सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार स्टेफन बोजिनी यांच्या पत्नी जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयानं परवानगी दिली नाही. नंतर त्यांनी वाद्य घेतलं आणि रुग्णालयाबाहेर आपल्या पत्नीला आवडणारं गाणं वाजवलं. याचवेळी व्हिडीओ काढण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. फेसबुकवर 8 नोव्हेंबर पोस्ट केला होता. ज्याला आतापर्यंत ६४६ हून अधिक शेअर २०० हून अधिक कमेंट्स केल्या आहेत. बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....