कोरोनानंतर आता अनेक शहरांमध्ये कोरोना वॅक्सीन अनिवार्य केली आहे. म्हणजे जर तुम्ही शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाल तर तुम्हाला आधी वॅक्सीनेशनचं सर्टिफिकेट दाखवावं लागतं. तेव्हाच तुम्हाला आत एन्ट्री मिळते. अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये एक होस्ट हेच काम करत होती. ती हॉटेल जेवायला त्यांनाच जाऊ देत होती ज्यांच्याकडे वॅक्सीनेशनचा पुरावा आहे. पण अशात तीन महिला आल्या. त्यांना होस्टने वॅक्सीनेशनचं प्रूफ मागितलं. तर त्या रागावल्या. नंतर होस्टला त्यांनी मारहाण केली.
abc7ny नुसार, ही घटना Carmine रेस्टॉरन्टमधील आहे. गुरूवारी सांयकाळी ५ वाजता तीन महिला आल्या. त्यांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करायचं होतं. शहरातील नवीन गाइडलाइननुसार, प्रूफ दाखवणारेच आत जाऊ शकत होते. पण होस्टने जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ मागितलं तेव्हा त्यांना या गोष्टीचा राग आला. त्यांनी २२ वर्षीय होस्टला मारहाण केली. ही तरूणी इथे आठवड्यातून तीन दिवस काम करत होती.
इतकंच नाही तर या तीन महिलांनी येथील आणखी दोन स्टाफ मेंबर्सना देखील मारहाण केली. नतंर तिघींनाही पोलिसांनी अटक केली. पीडित तरूणीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे अचानक या महिला तरूणीला मारहाण सुरू करतात. तरूणी ओरडते. आजूबाजूला उभे असलेले लोक तिला वाचवण्यासाठी पुढे येतात. महिलांनी तरूणीला धमकीही दिली. तेव्हा ती रडत होती.