सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज प्राण्यांबाबत, पक्ष्यांबाबत नवीन माहिती मिळत असते. लोकांनाही ही इंटरेस्टींग माहिती वाचण्याची आवड निर्माण होते. प्राण्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी लोकांना थक्क करतात. आता घुबड या पक्ष्याबाबतच बघा ना लोकांना किती उत्सुकता असते. पण हा पक्षी तसा फार कमी बघायला मिळतो. याच पक्ष्याच्या पिल्लाबाबत आज एक आश्चर्यकारक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घुबडाच्या पिल्लाची झोपण्याची स्टाइल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Mark Rees यांनी हा फोटो ट्विट केलाय. त्यांनी लिहिले आहे की, 'मला आत्ताच समजलं की, घुबडाचं पिल्लू तोंड जमिनीच्या बाजूने करून झोपतं. कारण त्यांचं डोकं फार वजनी असतं. तसेच मी आजपर्यंत घुबडाचे पाय पाहिले नव्हते'. हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून लोकांना एक अनोखी माहिती यातून मिळते आहे. त्यामुळे हा फोटो लोक शेअर करत आहेत.
अनेकजणांनी घुबडाच्या पायांचे फोटो कमेंटमध्ये शेअर केले आहेत. कारण घुबडाचे पाय सहजासहजी बघायला मिळत नाही.
आतापर्यंत या फोटोला 78 हजारांपेक्षा अधिक लाइक्स, 25 हजारांपेक्षा अधिक रिट्विट आणि 1 हजारपेक्षा अधिक कमेंट मिळाल्या आहेत. लोकांना ही माहिती आणि फोटो फारच पसंत पडला आहे. त्यामुळे ते इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करत आहेत.
घुबडाचं तोंड हे आकाराने मोठं असतं. घुबडाचं पिल्लू हे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे काही दिवस ते असेच झोपतात. नंतर मोठे झाल्यावर ते बसल्या बसल्या झोपतात.
जबरदस्त! बैलाचा इतका भारी व्हिडीओ तुम्ही आधी कधी पाहिला नसेल, एकदा बघाच....
Video! ...जेव्हा मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्याशी पंगा घेतात, बघा पुढे काय होतं!