सोशल मीडियावर जगभरातील प्राण्यांचे कधी मजेदार तर कधी हैराण करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ लोकांना बघायला खूप आवडतात. लोक प्राण्यांचे हे व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघतात कारण असे नजारे सहजपणे बघायला मिळत नाहीत. या व्हिडिओंमध्ये प्राण्यांचं जंगलातील अवघड आणि आव्हानात्मक जीवनही बघायला मिळतं.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक जिराफ दिसत आहे. जिराफ एक लांब मान असलेला उंच प्राणी ज्याचं सगळ्यांनाच आकर्षण असतं. या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, जिराफासाठी पाणी पिणं किती आव्हानात्मक असतं. कारण त्यांची लांबी.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक जिराफ एका नदीकिनारी उभा आहे. त्याला पाणी प्यायचं आहे, पण त्याच्या शरीराच्या रचनेमुळे त्याला सहजपणे पाणी पिता येत नाही. नंतर तो पाय आणि मानेचा बॅलन्स करून पाणी पितो.
हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंट एक्सवर @wonderofscience नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिलाय. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, प्रत्येक वेळी पाणी पिणं त्याच्यासाठी किती अवघड होत असेल.