Optical illusion : आजकाल लोक मोबाइलवर जास्त वेळ घालवतात. पण जेव्हा आपल्या आयुष्यात टीव्ही-मोबाइल आणि मनोरंजनाची इतकी साधनं नव्हती तेव्हा लोक टाइमपाससाठी काय करत होते? ते वेगवेगळी कामे करत होते आणि मेंदुची कसरत होणारी कामे करत होते. ते गणित आणि वेगवेगळ्या शब्दांचे कोडं सोडवत होते. आजही असे शब्द किंवा अंकाचे कोडं सोडवणं लोकांना पसंत आहे.
काही पझल्स डोळ्यांची परीक्षा घेतात आणि तर काही बुद्धी आणि तर्काची. सध्या असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात तुमची तर्कशक्ति टेस्ट करता येईल. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हॅट घातलेल्या एका व्यक्तीचा फोटो दिसत आहे. पण यात काही नंबर्स लपलेले आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत.
फोटोमध्ये तुम्हाला एक चेहरा दिसत आहे. या व्यक्तीने डोक्यावर एक टोपी घातली आहे. पण सोबतच या फोटोत अनेक नंबर्स लपलेले आहेत. जे शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत करावी लागणार आहे. फोटोत व्यक्तीच्या डोक्यावरील टोपीपासून ते डोळे-कान सगळे नंबरांपासून तयार आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हेच आहे की, या फोटोत लपलेले नंबर्स तुम्हाला शोधायचे आहेत. एकूण किती आणि कोणते नंबर्स आहेत ते शोधा. यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.
काय आहे बरोबर उत्तर?
हा फोटो पोस्ट केल्यानंतर साधारण 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. शेकडो लोकांनी हा फोटो लाइकही केला. हे पझल अनेक लोकांनी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. कुण 7 तर कुणी 8 असं याचं उत्तर दिलं. तेच काही लोकांनी 9 असं उत्तर दिलं. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, फोटोत एकूण 9 नंबर आहेत. यात 1 ते 9 पर्यंतचे सगळे नंबर आहेत. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हालाही यातील सगळे नंबर दिसून येतील. पण तुम्ही चॅलेंज तेव्हाच जिंकाल जेव्हा तुम्ही नंबर 7 सेकंदात शोधू शकाल.