Sink cleaning tips : किचन सगळ्यांच्याच घरातील एक महत्वाचा भाग असतो. इथेच परिवाराच्या आरोग्याचं रहस्य दडलेलं असतं. त्यामुळेच किचनच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष दिलं जातं. पण अनेकदा किचनमध्ये सिंकमध्ये पाणी जमा होण्याची समस्या होत असते. ज्यामुळे सिंकमधून घाणेरडा वास येतो. अशात लोकांना ही समस्या कशी दूर करायची हे माहीत नसतं. आज आम्ही तुम्हाला सिंकमध्ये तुंबलेलं पाणी गायब करण्याचा उपाय सांगणार आहोत.
किचन सिंक कसं साफ करावं?
- सामान्यपणे तुम्ही आठवड्यातून किमान एक किंवा दोन वेळा डीप क्लीन केलं पाहिजे. त्याशिवाय रोज भांडी घासल्यानंतर सिंक चांगलं स्वच्छ करा. त्यात काही कचरा किंवा काही अडकलं असेल ते काढून टाका. सिंकमधील तेलाचे किंवा चिकट पदार्थांचे डाग क्लीन करा.
- जर सिंक ब्लॉक असेल तर एक कप गरम पाण्यात १ते २ चमचे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस पाइपमध्ये टाका. काही वेळाने पाइपमध्ये अडकलेली घाण बाहेर पडेल. पाणी निघून गेल्यावर सिंक चांगलं स्वच्छ करा आणि त्यात भरपूर साधं पाणी टाका.
- ईनो आणि लिंबाच्या रसानेही तुम्ही सिंक साफ करू शकता. हा एक चांगला उपाय आहे. दोन्ही गोष्टींची मिश्रण पाईपमध्ये टाका नंतर पाण्याने सिंक धुवून घ्या.
- सिंकमध्ये पुन्हा पुन्हा अडकत असेल तर भांडी घासताना काळजी घ्या की, शिल्लक राहिलेलं अन्न त्यात टाकू नका. ते आधीच बाहेर काढा मगच भांडी घासा.
- तसेच बाजारात सिंक क्लीअर करणारे अनेक पावडर मिळतात. एक पुडी पावडर सिंकमध्ये टाका आणि वरून एक बकेट गरम पाणी टाका याने सिंक क्लीअर होईल.