Bathroom Cleaning Tips : आजकाल नवं बांधकाम असलेल्या घरांच्या बाथरूममध्ये शॉवर आणि जेट स्प्रेचा वापर केला जातो. सहजपणे रोज यांचा रोज वापर केला जातो. पण तुम्हीही पाहिलं असेल की, जर यांची नियमितपणे स्वच्छता केली नाही तर त्यातून पाणी आधीसारखं फोर्सने न येता हळुवार येतं. ज्यामुळे यांचा वापर करताना समस्या होते. अनेकदा ही सामान्य समस्या दूर करण्यासाठी प्लंबरला बोलवलं जातं.
अशात तुम्ही काही ट्रिक्स वापरून वापरून शॉवर आणि हॅंड जेटमधील ब्लॉकेज दूर करू शकता. याने पाणी आणखी वेगाने येईल. क्षार किंवा कचऱ्यामुळे अनेकदा यातून पाणी हळुवार येतं. अशात काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ईनो आणि लिंबाचा रस
शॉवर आणि हॅंड जेटमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी ईनो आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. या गोष्टी मिक्स करून पोस्ट तयार करा. हे मिश्रण एका पॉलिथिनमध्ये भरून त्यात शॉवर आणि हॅंड जेट टाकून ठेवा. काही वेळाने दोन्ही गोष्टी ब्रशच्या मदतीने घासून घ्या. यातील ब्लॉकेज दूर होतील.
बेकिंग सोडा आणि विनेगर
बेकिंग सोडा आणि विनेगरचा वापर अनेक गोष्टींवरील डाग काढण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी केला जातो. यासाठी बेकिंग सोड्यात व्हाईट विनेगर टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण एका भांड्यात टाका आणि त्यात शॉवर आणि हॅंड जेट टाकून ठेवा. काही वेळाने दोन्ही गोष्टी पाण्याने धुवून घ्या. यातील ब्लॉकेज दूर झालेले दिसतील आणि पाण्याचा फ्लोही वाढलेला असेल.
मीठ आणि विनेगर
बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही मीठ आणि विनेगरचाही वापर करू शकता. यासाठी मीठ आणि विनेगर मिक्स करा. नंतर हे मिश्रण एका भांड्यात टाका, त्यात शॉवर आणि हॅंड सेट टाकून ठेवा. काही तास ते तसेच राहू द्या. त्यानंतर ब्रशच्या मदतीने घासून काढा. त्यातील ब्लॉकेज मोकळे झाले असतील.