सामान्यपणे सगळ्याच लोकांच्या घरात उंदरांची समस्या असते. घरात उंदीर वाढले की, वेगवेगळ्या वस्तूंचं नुकसान होतं. घरातील कपडे, धान्य, वायर सगळं काही खातात. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. अशात लोक उंदीर घरातून पळवण्याचे वेगवेगळे उपाय शोधत असतात. पण त्यानेही काम होत नाही. तुम्हीही वेगवेगळे उपाय करून थकले असाल तर आज आम्ही तुम्हाला एक सोपा आणि खास उपाय सांगणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला केवळ १० रूपये खर्च करावे लागतील.
तुम्हाला जर तुमच्या घरातून उंदीर पळवून लावायचे असतील आणि वेगवेगळ्या उपायांसाठी तुम्ही खूपसारे पैसे खर्च केले असतील तर आता एक सोपा उपाय करा. केवळ १० रूपयाचं तुरटीचं पावडर तुमच्या घरातील उंदीर पळवून लावू शकतं. ते कसं वापरावं हे जाणून घेऊ...
तुरटीला घाबरतात उंदीर
सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की, उंदीर तुरटीला घाबरतात का? तर तुरटीचा गंध आणि टेस्ट उंदरांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे जर त्यांना त्यांच्या रस्त्यात तुरटी दिसली तर ते त्यांचा मार्ग बदलतात. अशात तुम्ही उंदीर पळवून लावण्यासाठी तुरटीचा चांगला वापर करू शकता.
तुरटीचं पावडर टाका
उंदीर पळवून लावण्यासाठी तुरटीचा वापर करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुरटीचं पावडर. १० रूपयात तुरटीचं पावडर खरेदी करा. हे पावडर तुमच्या घराच्या मेन गेटच्या आजूबाजूला टाका. त्यानंतर जिथे उंदीर येतात तिथे टाका.
तुरटीची गोळी
तुम्ही तुरटीच्या गोळीचाही वापर करू शकता. तुरटीच्या गोळ्या तुम्ही घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा, किचनमध्ये आणि कपाटांमध्ये ठेवा. जेवणाच्या गोष्टींजवळ तुरटीचं पावडर थोडं टाकून ठेवा. याने उंदीर पळून जातील.
तुरटीचा स्प्रे
तुम्हाला जर घरातून उंदीर नेहमीसाठी पळवून लावायचे असतील तर तुरटीचं पाणीही वापरू शकता. यासाठी तुरटीचं पावडर एक स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि हे पाणी घरात शिंपडा. याने तुमची समस्या दूर होईल.
काय काळजी घ्याल?
तुरटीचा वापर करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण याने त्वचा आणि डोळ्यांचं नुकसानही होऊ शकतं. तसेच किचन रोज स्वच्छ करा आणि अन्नपदार्थ झाकूण ठेवा. उंदरांना घरात येण्यासाठी जागा मिळू नये म्हणून योग्य ती काळजी घ्या.