फॅशनच्या नावावर अलिकडे काय विचित्रपणा चाललेला आहे. हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. या विचित्रपणाचा कहर म्हणजे हे शूज म्हणता येतील का? असाही प्रश्न पडतो. हे शूज पाहून कुणाला चांगलं तर वाटणार नाही हे जितकं खरं आहे. तितकच हे शूज पाहून काहींना भीती वाटेल हेही तितकच खरं आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे महिलांना हे शूज पसंतीस पडत आहेत.
कॅनडातील फीकल मॅटर या ब्रॅन्डने त्वचेच्या रंगाशी मिळत्या जुळत्या रंगाची एक सॅंडल तयार केली आहे. सध्या हा ह्यूमन क्सिन बूट सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होता आहे. ही सॅंडल पाहून याच्या किंमतीची चर्चा होणार नाही तर नवलच. तुम्हालाही या सॅंडलची किंमत वाचून धक्का बसेल. कारण या विचित्र सॅंडलची किंमत ७. ४ लाख रुपये इतकी आहे.
आता इतकी महाग सॅंडल आहे म्हटल्यावर यात इतकं काय असणार? असाही प्रश्न काहींना पडणे स्वाभाविक होते. पण हे कुणालाच माहिती नाहीये. बरं ही सॅंडल तयार करण्याचा विचार एका फोटोशॉप्ड इमेजवरुन आला आहे. फीकल मॅटर्स हा ब्रॅन्ड आपल्या हटके डिझाइनसाठी लोकप्रिय आहे. ही सॅंडल हॅनाह रोज डाल्टन आणि स्टीवन राज भास्करण यांनी डिझाइन केली आहे.
भास्करण याने एका मलाखतीत सांगितले की, 'ही सॅंडल हे दाखवते की, सोशल मीडियात आमच्या पसंतीला किती पसंती मिळाली. सोबतच लोकांच्या मनात ही लालसा असते की, सोशल मीडियात जे ट्रेन्ड होत आहे ते ट्राय केलं जावं'.
बरं, ही सॅंडल तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला स्पेशल ऑर्डर द्यावी लागणार आहे. कारण हे कस्टम बूट आहेत. म्हणजे तुम्ही ऑर्डर केल्यावर तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळते जुळते बूट तयार केले जातील. जर तुम्हालाही हे बूट हवे असेल तर खरेदी करु शकता.