मगरींची गणना जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये केली जाते. मगर तिच्या जबड्यात आलेल्या कुठल्याही प्राण्याची चिरफाड करू शकते. तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये मगरी छुप्या पद्धतीने पाणी पिणाऱ्या प्राण्यांवर हल्ला करते आणि पाण्यात घेऊन जाते. अशा परिस्थितीत मगरीसमोर माणसाचा निभाव लागणे अशक्य आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये मगर माणूसकी दाखवतीये.
व्हिडिओमध्ये एक मगर नदीत बुडून मेलेल्या लहान मुलाचा मृतदेह पाठीवर घेऊन पाण्याबाहेर येते आणि कुटुंबीयांच्या ताब्यात देते. त्या मुलाचे कुटुंबीयांना बऱ्याच वेळापासून मुलाचा शोध घेत होते, पण त्यांना मुलाचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर एका मगरीनेच त्यांची मदत केली आणि त्यांचा मुलाचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक विशालकाय मगर मुलाचा मृतदेह पाठीवर घेऊन कुटुंबीयांजवळ येत आहे. ती बोटीजवळ पोहोचते, तिथे उपस्थित लोक मुलाचे शरीर मगरीच्या पाठीवरुन उचलून घेतात. अशा प्रकारे मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन मगर तिथून निघून जाते. तुम्ही मगरींना माणसांवर हल्ला पाहिलं असेल, पण क्वचितच अशी औदार्य दाखवणारी मगरी तुम्ही पाहिली असेल.
हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'बुडलेल्या मुलाचा मृतदेह पाठीवर घेऊन एक महाकाय मगर. इंडोनेशियातील मगरीने भरलेल्या नदीतील व्हिडिओ.' अवघ्या 53 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.