मोठ्या शहरात तसंच उपनगरांमध्ये वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यामागे ट्रॅफिक पोलिसांची खूप मोठी भूमिका असते. साधारणपणे आपण अनेकदा पाहिलं असेल जास्त वाहतूक असल्यामुळे एखादी रूग्णवाहिका रस्त्यावर अडकली तर रूग्णाला मृत्यूचाही सामना करावा लागू शकतो. पण हैदराबादमधील या एक ट्रॅफिक पोलिसाने जे केले ते पाहून तुम्ही चकीत व्हाल. सोशल मीडियावर एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हैदराबादमध्ये एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर या रुग्णावाहिकेला रस्ता देण्यासाठी वाहतूक पोलिसाने जवळपास २ किलोमीटरचा प्रवास धावत केला आहे. या पोलिसाचे नाव बाबजी असून शहरातल्या गर्दीच्या रस्त्यावर हा प्रसंग घडला. एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडिया युजर्ससह वरिष्ठ अधिकारी यांनीही या पोलिसाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
बाबजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी त्यांनी एक रुग्णवाहिका पाहिली. या रुग्णवाहिकेत रुग्ण गंभीर स्थितीत होता. वाहतूक कोंडी झाल्यामुळे रूग्णाचे कुटूंबिय खूप चिंतेत होते. म्हणून काहीही करून रुग्णवाहिकेला रस्ता देण्याचा विचार या पोलिसानं केला. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाला त्यांनी ट्रॅफिक सोडून त्यांच्या समोर चालण्यासाठी विनंती केली. यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा मिळाला. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. जबरदस्त! भारतातील दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ कॅमेरात कैद; पाहा व्हायरल फोटो
या पोलिसाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुग्णवाहिलेला रस्ता देण्यासाठी पोलिस धावत आहे. आयपीएस अधिकारी अनिल कुमार यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल