सोशल मीडियावर हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका कचरा वेचणाऱ्या महिलेनं कुत्र्याचा जीव वाचवला आहे. सोशल मीडियावर या फोटोला चांगलीच पसंती मिळताना दिसून येत आहे. ट्विटर व्यतिरक्त इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही या व्हिडीओ मोठया प्रमाणात शेअर केला जात आहे. आयएएस अधिकारी अवशीष शरण यांनी सोशल मीडियवर हा व्हिडीओ शेअर करत रिएक्शन्स दिल्या आहेत.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलेच्या हातांमध्ये एक झोला आहे. त्यात कचरा भरलेला आहे. एक कुत्रा रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी एक गाडी तिथे येते. महिला कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि एखाद्या लहान मुलाचा हात पकडल्याप्रमाणे या मुक्या जीवाला रस्ता पार करण्यास मदत करते. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका माणसानं हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या जंगलात लपलाय विषारी साप; बघा सापडतोय का? अनेकांनी मानली हार पण साप काही दिसला नाही
आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, 'माणुसकी' यासह त्यांनी हार्टचे इमोजीसुद्धा शेअर केली आहे. हा व्हिडीओ २५ जानेवारीला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर या व्हिडीओला २२ हजारांपेक्षा जास्त व्यूज मिळाले असून ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केला आहे. ३०० पेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ रिट्विटही केला आहे. लोक या महिलेचे खूप कौतुक करत आहेत. तसंच ट्विटरवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स द्यायला सुरूवात केली आहे. बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...