निसर्ग किती कमाल आहे वेगवेगळ्या व्हिडीओंमधून किंवा प्रत्यक्षात आपण नेहमीच बघत असतो. असाच सुंदर निसर्गाचं दर्शन घडवणारा एक नजारा लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक हिमखंड म्हणजेच आइसबर्ग बघून लोक अवाक् झाले आहेत.
हा व्हिडीओ आयएफएस सुशांता नंदा यांनी शेअर केला असून कॅप्शनला लिहिले की, 'जेव्हा डोंगरातून बर्फ पडतो तेव्हा तो पाण्यात बुडण्याआधी वर येतो. अद्भुत...! आइसबर्ग हा वजनाने हलका असतो आणि त्यात समुद्राचं पाणी भरलेलं असतं. त्यामुळे आइसबर्ग समुद्रावर तरंगतो आणि वर येतो'.
यात तुम्ही बघू शकता की, हिमखंड समुद्राच्या पाण्यात बुडण्याऐवजी आधी वरच्या दिशेने जातो. हा नजारा पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ शूट करणारी व्यक्तीही थक्क झाली हे त्याच्या आवाजावरून जाणून घेऊ शकता. पुढील 13 सेकंदात आकाशाकडे जाणारा आइसबर्ग क्षणात पाण्यात मिसळतो.
Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण...