सोशल मीडियावर एका बाप लेकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका वेगळ्या अंदाजात बापानं आपल्या लहान मुलाला गाडीवरून उतरवलं आहे. या व्हिडीओला लोकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुसामी (IFS Officer Praveen Angusamy) यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या बाप-लेकाला आळशी नंबर १ चा पुरस्कार दिला आहे. अशा आशयाचे कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वडील बाईक चालवत असताना मुलगा वडिलांना पकडून मागे बसला होता. त्यानंतर त्यांनी गाडी थांबवून साईड स्टॅण्डला लावली. मग आपल्या पायाचा सपोर्ट देऊन लहान मुलाला खाली उतरवलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून १०० पेक्षाा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१
दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी चिमुरड्यानं एक अनोखा जुगाड केला आहे. आयएफएस अधिकारी पंकज राजपूत यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. आवश्यकता अविष्काराची जननी असल्याचे या व्हिडीओला कॅप्शन दिलं होतं. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहता येईल एक चिमुरडा कढईत बसला आहे. विशेष म्हणजे ही कढई एका जळत्या चुलीवर ठेवली आहे. खालून आग जळत असल्याचे दिसून येत आहे.
गरम पाणी अंगावर टाकण्यासाठी या मुलाचा सगळा खटाटोप सुरू आहे. एखाद्या गावाच्या ठिकाणाचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला असावा. तीस सेंकदाच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अनेक गमतीदार कमेंट्स या व्हिडीओवर आल्या होत्या. माणुसकीला सलाम! सुपरमार्केटमध्ये चष्मा साफ करायचं काम करायचा, कहाणी ऐकून एकानं दिले ३५ हजार