जंगलात वाघ तो वाघच असतो. वाघ आपल्या हद्दीत कोणाला शिकारीसाठी फिरकू देत नाही. एका डरकाळीने तो समोरच्याला गारद करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, एका आयएफएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एका बिबट्यावर वाघाने झेप घेत हल्ला केल्याचे दिसत आहे.
या व्हिडीओत वाघ आणि बिबट्या एकमेकांवर हल्ला करत नसल्याचे दिसत आहे. बिबट्याने जमिनीवर उडी घेतल्यानंतर वाघ लगेच झेप घेऊन बिबट्या जवळ जातो पण तो बिबट्यावर हल्ला करत नाही. बिबट्या जमिनीवर झोपतो तर वाघ त्याच्याभोवती फिरत असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडीओ 'भारतीय वन सेवा' अधिकारी सुशांत नंदा यांनी २२ फेब्रुवारी रोजी शेअर केला आहे. याला त्यांनी एक कॅप्शन दिली आहे, 'वाघ आणि बिबट्या समोरासमोर येणे थोडे अनैसर्गिक आहे', अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक व्हूज लाईक्स आणि सातशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या पोस्टला अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 'बिबट्याने पूर्णपणे आत्मसमर्पण केले, त्यामुळे वाघ मागे थांबला', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्याने, 'फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात हे विनाकारण नाही, असं लिहिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ सुशांत नंदा यांनी १४ फेब्रुवारीला पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, अशा प्रकारे वाघाचे वर्चस्व असलेल्या भागात बिबट्या जिवंत राहतो. वाघ सहजपणे झाडांवर चढू शकतात. त्यांचे मजबूत आणि तीक्ष्ण नखे त्यांना मजबूत पकड देतात त्यामुळे ते झाडाच्या खोडावर चढू शकतात. पण जसजसे त्यांचे वय वाढते तसतसे त्यांच्या शरीराचे वजन त्यांना तसे करण्यापासून रोखते, असंही त्या अधिकाऱ्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.