(Image credit- NBT)
गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम निर्सगावर आणि निसर्गाच्या सानिध्यात राहत असलेल्या वन्य प्राण्यावर झाला. माणसांना घाबरून पळणारे आणि मानवी वस्तीपासून दूर राहत असलेल्या प्राण्यांनी लॉकडाऊनच्या काळात मुक्त संचार करण्यास सुरूवात केली. परिणामी काही दुर्मीळ प्राण्याचे आणि पक्ष्याचे सौंदर्य पहिल्यांच दृष्टीस पडले. असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. असा वाघ तुम्ही या आधी कधीही पाहिला नसेल. भारतातील दुर्मिळ प्रजातींमध्ये यांचा समावेश आहे.
आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकमेव गोल्डन टायगर (मादी) वाघिण आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. नेटकरी या वाघिणीच्या सौंदर्याचे आणि वेगळेपणाचे कौतुक करत आहेत. काजीरंगा नॅशनल पार्कमधील हा फोटो आहे. हा फोटो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर महेश हेंद्रे यांनी कॅमेरात कैद केला आहे.
आयएफएस अधिकारी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केल्यानंतर या फोटोला १२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि दिड हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. गोल्डन टायगर आणि गोल्डन टॅबी टायगर, रॉयल बंगाल टायगर या वाघांच्या दुर्मीळ प्रजाती आहेत.
काही दिवसांपूर्वी वाघांचा असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दोन वाघांमध्ये लढाई सुरू होती. वाघिणीला जिंकण्यासाठी दोन वाघ एकमेंकांशी झुंज सुरू होती. या दोघांमध्ये बराचवेळ लढाई सुरू होती. त्यानंतर एक वाघिण सुद्धा त्या ठिकाणी आली. दूर उभं राहून ही वाघीण या वाघांची लढाई पाहत होती.
सुधा रमन यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, तुम्ही कधी वाघांना लढताना पाहिले आहे का? ही लढाई कुस्तीपेक्षा कमी नाही हरलेल्या वाघाला नवीन घरं शोधण्यासाठी बाहेर जावं लागतं. सुधा रमना यांनी हा व्हिडीयो 10 जुलैला शेअर केला त्यानंतर त्या व्हिडीओला हजारापेक्षा व्हिव्हज तर 100 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हुंडाई क्रेटाची एकमेव मालकीण; ३ कोटींचे घर असूनही रस्त्यावर लावते स्टॉल, ‘ती’ची कहाणी
हुबेहुब मानवी चेहऱ्याप्रमाणे दिसणारा दुर्मिळ मासा कॅमेरात कैद; पाहा व्हायरल फोटो