उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. गुलरिहा येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या लोकांना लॉटरी लागली आहे. अनेकांना 200 रुपयांच्या नोटांच्या ठिकाणी 500 रुपयांच्या नोटा मिळाळ्या आहेत, या संदर्भात पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनीएटीएम बंद केले आहे. या तापासात 500 रुपयांच्या 180 नोटा काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
महाराजगंज चौकात इंडिया वन बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी एका तरुणाने एटीएममध्ये 400 रुपये काढण्याचा प्रयत्न केला. एटीएममधून दोनशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांच्या दोन नोटा निघाल्या. पैसे घेऊन तरुण निघून गेला. काही वेळाने इतर काही लोकांनी एटीएममधून 400 रुपये काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना फक्त 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. हळूहळू ही गोष्ट शहरात पसरली पैसे काढण्यासाठी अनेकांच्या रांगा लागली होती.
खबरदार, लाल लिपस्टिक लावाल तर... ! हुकुमशाहाला लिपस्टिकचे वावडे, महिलांसाठी बजावला नवा आदेश
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी एटीएम बंद केले, आणि या संदर्भात बँकेला माहिती दिली. या घटनेचा तापस केला, यात 500 रुपयांच्या 180 नोटा एकून 90 हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
कॅश बॉक्समधील गडबडीमुळे अशा घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी कॅश व्हॅन घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये पैसे टाकल्याचा आरोप आहे. या वेळी कॅश बॉक्समध्ये ठेवायच्या असलेल्या 200 रुपयांऐवजी 500 च्या नोटा ठेवण्यात आल्या. त्यामुळे एटीएममधून पाचशे रुपयांच्या नोटा निघाल्या, असल्याचे समोर आले आहे.