Social Viral : आयोध्या नगरीत राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलंय. येत्या २२ जानेवारीला हे मंदिर सर्वसामन्यांसाठी खुलं करण्यात येईल त्याच दिवशी प्रभूरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा देखील करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासूनची रामभक्तांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. भारतीय या क्षणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गायिका स्वस्ति मेहुलनं गायलेलं राम आएंगे... हे गाणं सध्या चर्चेत आलंय. तिच्या गायनाची पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील भूरळ पडली आहे.
गायिका स्वस्ति मेहुलने गायलेल्या या गाण्याचा व्हिडीओ पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून शेअर केलाय. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाच्या भजन गायल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. शिवपूरीच्या प्रसिद्ध गायिका स्वस्ति मेहुल यांनी गायलेलं गाणं चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. स्वस्ति मेहुलच्या सुरेल, सुमधूर गायकीची पंतप्रधानांना देखील भूरळ पडली आहे. अवघी आयोध्यानगरी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भक्तीमय झाली आहे. त्यात स्वस्ति मेहुलनं गायलेल्या गाण्याने चार चांद लावले आहेत.
स्वस्ति ने गायलेलं गाणं एकदा ऐकंल की त्यांचा आवाज वारंवार कानात घुमत राहतो, मन भक्तिभावार रमून जातं. डोळ्यात अश्रु तर मनात भावतरंग उमटतात. असं मोदींनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. या पोस्टमध्ये त्यांनी स्वस्ति यांनी गायलेल्या गाण्याची लिंक देखील शेअर केलीय.
पाहा व्हिडीओ -
या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल १.५ मिलीयन पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे.