देशभरात १५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी भारताचा ७३ वा सेना दिवस साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या दिग्गज नेत्यांनी लष्कराप्रती आपला सन्मान आणि आदर जाहीर करत सैन्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेना दिवस दरवर्षी १५ जानेवारीला फिल्ड मार्शल के.एम कारिय्पाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
या दिनाच्या निमित्ताने एका कलाकाराने भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आपल्या कलेनं एक अनोखी वस्तू तयार केली आहे. लोकांनी ही वस्तू पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. पुरू येथे वास्तव्यास असलेले कलाकार शाश्वत रंजन साहू यांनी माचिसच्या काड्यांपासून भारतीय सेनेचा टँक बनवला आहे. हा टँक खरोखरच खूप सुंदर दिसत आहे. माचिसच्या काड्यांनी संपूर्ण टँक तयार करण्यासाठी तब्बल ६ दिवसांचा कालावधी लागला असून २२५६ माचिसच्या काड्यांनी भारतीय सेनेचा हा टँक तयार केला आहे. आत्महत्येच्या १ वर्षानंतर आईला सापडली मुलाची सुसाइड नोट, धक्कादायक कारणाचा खुलासा....
शाश्वतने सांगितले की, ''मला हा माचिसचा टँक तयार करण्यासाठी जवळपास ६ दिवसांचा कालावधी लागला. २२५६ माचिसच्या काड्यांचा वापर करून हा टँक तयार केला असून भारतीय सेनेचे अभिनंदन करण्यासाठी हा टँक मी तयार केला आहे. या टँकची उंची ९ इंच आणि लांबी ८ इंच आहे. '' फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता खूपच आकर्षक आणि सुंदर टँक दिसून येत आहे. एका अप्रतिम, अनोख्या कलेचे उत्तम उदाहरण आहे. सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज...