भारतीय सेनेच्या पराक्रमाच्या घटना संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. माणुसकीच्या बाबतीत कोणीही भारतीय सेनेचा सामना करू शकत नाही. जम्मू काश्मिरमधून भारतीय सेनेच्या चांगुलपणाचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. याठिकाणी एक नवजात बाळ आणि आईला आपल्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी सैनिकांचे प्रयत्न सुरू होते.
बर्फवृष्टीमध्ये ६ किमी चालून सैनिकांनी या मायलेकाला आपल्या घरी पोहोचवले आहे. ही घटना कुपवाडा जिल्हातील आहे. एक आई आपल्या नवजात बाळासह बर्फवृष्टी सुरू असताना एका रुग्णालयात अडकली होती. या नवजात बाळासह आईला रुग्णालयातून बाहेर काढत आपल्या घरी सुखरूप पोहोचवण्याचे काम सैनिकांनी मिळून केले आहे.
भारतीय सेनेच्या चिनार कोरच्या ट्विटर हँण्डलवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. '' भारतीय सेनेच्या जवानांनी दर्दपोराचे रहिवासी असलेले फारूक खसाना यांची पत्नी आणि नवजात बाळाला अति बर्फवृष्टीच्या वातावरणातून ६ किलोमीटर पायी चालत आपल्या घरी सुरक्षित पोहोचवले आहे.'' या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय कठीण परस्थितीत महिलेला खांद्यावर घेऊन बर्फवृष्टीतून मार्ग काढत आपल्या घरी पोहोचवलं आहे. बाप रे बाप! एका बेडकाची किंमत दीड लाख रूपये, जाणून घ्या काय आहे इतकी किंमत मिळण्याचं कारण....
वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार फारुक यांच्या एका नातेवाईकानं या घटनेबाबत सांगितले की, ''खसाना यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला काल जन्म दिला. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर हे दोघेही बर्फवृष्टीत अडकले होते. 28RR बटालियनच्या सेनेच्या जवानांनी या दोघांनाही घरी पोहोचण्यासाठी मदत केल्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. '' वाह, भारीच! मासेमाराच्या हाती लागला २ कोटींचा खजिना; व्हेलच्या उलटीनं नशीबच पालटलं ना राव