काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये चांगलाच संताप बघायला मिळाला. अशातच भारतीय लष्कराबाबतची एक कौतुकास्पद आणि बहादुरी दर्शवणारी बातमी समोर आली. भारतीय सेनेच्या जवानांनी एका जबरदस्त काम केलंय. ही घटना आहे अरूणाचल प्रदेशातील. इथे एका गर्भवती हरीणाचा जीव वाचवण्यासाठी सेनेच्या एका जवानाने वाहत्या नदीत उडी घेतली.
ही घटना आहे 2 जूनची. Easterncomd या ट्विटर यूजरने याबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, 'भारतीय सेनेच्या यूनिटने 2 जूनला एका मादा हरीणाला जायडिंग खो नदीत बुडण्यापासून वाचवले. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने त्यावर उपचार करण्यात आले. नंतर हरीणाला जंगलात सोडण्यात आले'.
हरीणांची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या हरणाला बार्किंग डिअर असं म्हटलं जातं. कारण या हरीणाच्या आजूबाजूला जेव्हा शिकारी असतात तेव्हा ते कुत्रे भूंकल्यासारखा आवाज काढू लागतात'.
भारतीय लष्कराच्या या कामाचं सोशल मीडियातील लोकांकडून कौतुक केलं जात आहे. तसेत ही पोस्ट ट्विटरवर व्हायरलही झाली आहे.
धक्कादायक व्हिडीओ : 8 घरे समुद्रात कागदाप्रमाणे गेली वाहून, वाचला केवळ एक कुत्रा....
मला माफ कर बाळा! गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर उसळली संतापाची लाट...