प्रेमाला वय नसतं असं आपण नेहमीच ऐकत असतो. याचंच उदाहरण इंडोनेशियात बघायला मिळालं. इथे एका ३७ वर्षीय महिलेने स्वत:च्या इच्छेने एका १०३ वर्षीय पुरूषासोबत लग्न केलंय. आता जगभरात या लग्नाची चर्चा रंगली आहे. १०३ वर्षीय पुआंग कट्टे यांनी ३७ वर्षीय इंडो अलंगशी सहमतीने लग्न केले. या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सोशल मीडियातील काही लोकांनी कमेंट करून या लग्नाला विरोध केला आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पुआंग हा डच कर्नल आहे. त्यांनी देशासाठी १९४५-१९४९ दरम्यान युद्धात भाग घेतला होता. दरम्यान पुआंगच्या नातेवाईकांनी स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, आश्चर्याची बाब म्हणजे पुआंग यांना इंडोचे खरे वय माहित नव्हते. लग्नानंतर 'ट्रिब्यून न्यूज'ने या जोडप्याचे खरे वय उघड केले. दोघांच्या वयातील फरक पाहून लोक हैराण झाली आहेत.
या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान आता पुआंगने नवऱ्या मुलीच्या घरच्यांना हुंडा दिल्याच्याही चर्चा आहेत. मात्र 'ट्रिब्यून न्यूज'ने ही रक्कम कमी असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, वयाची एवढी तफावत असलेला हा पहिला प्रकार नाही. याआधी ऑडिटी सेंट्रलच्या वृत्तानुसार, याआधीही जास्त वयाच्या पुरूषाने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न केल्याच्या घटना इंडोनेशियात घडल्या आहे. २०१७ मध्येही ७६ वर्षांच्या पुरुषाने 16 वर्षांच्या मुलाशी लग्न केले होते.