कोरोनाच्या संकटात गेल्या दोन ते तीन महिन्यात देशभरातील बेरोजगारी आणि गरिबी वाढली आहे. कोरोनाच्या माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन झाल्याने अनेकांची नोकरी, व्यवसाय बंद होते. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी लोकांनी जे मिळेल ते काम करायला सुरूवात केली. बेरोजगारीमुळे अनेक प्राध्यापक, शिक्षक, अभिनेते यांनी खाद्यपदार्थाचे लहानसं दुकान सुरू केल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील. अशीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
इंदूरचा रहिवासी असलेल्या १४ वर्षीय मुलाने आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी अंड्याची गाडी रस्त्यावर उभी केली. बुधवारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पीपल्याहाना क्षेत्रातील ही अंड्याची गाडी पूर्णपणे उलटी केली. त्यानंतर गाडीवरील सगळी अंडी फुटली. सोशल मीडियावर या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अमानवी कृत्य केल्याचे नेटकरी म्हणाले आहेत.
फेसबुक युजर अमन आकाशने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. की या १४ वर्षीय मुलाला अंडी विकून आपले घर चालवायचे होते. परंतु पालिकेची गाडी आली काही काही क्षणात सारं काही उद्ध्वस्त झालं. या लहान मुलाचा निराश झालेला चेहरा पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.
ही घटना व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या १४ वर्षीय मुलाची आणि त्याच्या आजोबांची तक्रार दाखल केली आहे. देवेद्र सिंह यांनी सांगतले की, या रस्त्यावर या मुलाचे आजोबा विजय रायकवार हे अंड्याची गाडी लावतात. नातवाची शाळा सध्या बंद असल्यामुळे तोही या गाडीवर लक्ष देतो.
बुधवारी पालिका कर्मचारी आले आणि त्यांनी लहान मुलाशी धक्काबुक्की करत अंड्याची गाडी उधवस्त केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत. अनेकांना संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण