सध्या जगभरात वेगवेगळ्या डिझाइनच्या इमारती, घरे तयार करण्यावर जोर दिला जात आहे. काही देशांमध्ये तर जास्तीत जास्त उंच इमारती तयार करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. पण आता एक फारच आश्चर्यकारक डिझाइन समोर आलं आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने उलटं घर तयार केलं आहे. 'अपसाइड डाउन हाऊस' असं या घराला नाव दिलं असून हे घर बघण्यासाठी सध्या लोकांची गर्दी होत आहे. जितकं हे घर बाहेरुन वेगळं आहे, तितकं ते आतून सुंदर आहे.
अपसाइड डाउन हाऊस यूके कंपनीच्या सीईओंनी सांगितले की, 'माझ्या बिझनेस पार्टनरनेच ब्रिटनमध्ये अपसाइड डाऊन हाऊस तयार करण्याची संकल्पना समोर आणली होती'. हे अनोखं घर ११ दिवसात तयार तयार झालं. रिपोर्ट्सनुसार, जून २०१९ मध्ये हे घर सर्वसामान्य लोकांसाठी उघडलं जाणार आहे. जेणेकरुन त्यांनाही उलट्या घराचा अनुभव घेता येईल.
या घराच्या आत गेलं की, यातील फर्निचर हे कन्फ्यूज करतं. कारण घरातील एक एक वस्तू ही उलटी ठेवण्यात आली आहे. घराच्या छताला घरातील सर्व वस्तू चिकटवण्यात आल्या आहेत.
या अनोख्या घरात वेळ घालवायचा असेल तर यासाठी लोकांना ४ पाउंड म्हणजेच ३७५ रुपये मोजावे लागणार आहेत. तुम्हालाही हे घर बघायचं असेल तर बोर्नमाउथ, यूकेचं तिकीच बूक करा.