iPhone Price In Pakistan: आयफोन 15 च्या नवीन सीरीजची विक्री शुक्रवारी 22 सप्टेंबरपासून सुरू झाली. iPhone 15 च्या 128GB मॉडेल, 48 MP लेन्स, A16 Vionic chip आणि iOS 17 सह बनवलेले आहे. त्याची किंमत भारतात 79,900 रुपयांपासून सुरू आहे. तर iPhone 15 Plus 128GB मॉडेलची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते. पण आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये हे फोन कितपत उपलब्ध आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं तर, पाकिस्तानमध्ये आयफोन 15 सिरीजची किंमत इतकी जास्त आहे की सोशल मीडिया वापरकर्त्यांना ते जाणून घेतल्यावर धक्का बसला! काही वापरकर्त्यांनी याबद्दल मतही व्यक्त केली.
20 सप्टेंबर रोजी @pallavipandeyy नावाच्या युजरने मायक्रोब्लॉगिंग साइटवर एक पोस्ट लिहिली. तिच्या म्हणण्यानुसार, चलनातील फरकामुळे पाकिस्तानात iPhone 15 ची किंमत तब्बल ७ लाखांच्या वर आहे. यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर लोकप्रिय झाली, ज्याला आतापर्यंत साडे 3 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक युजर्सनी कमेंट्सही केले. एका व्यक्तीने लिहिले- भारतातून खरेदी करा आणि नंतर पाकिस्तानमध्ये विक्री करा. दुसऱ्याने सांगितले की, या पैशात यूपीमध्ये प्लॉट विकत घेता येईल. त्याचप्रमाणे इतर वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
----
----
नक्की खरं काय अन् खोटं काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये iPhone 15 ची किंमत 3,66,708 रुपयांपासून सुरू होते. सर्वात महाग iPhone 15 Pro Max with 512 GB आहे ज्याची किंमत Rs 5,99,593 आहे , ज्याची किंमत भारतात तुम्हाला Rs 1,79,900 असेल. पाकिस्तानचे चलन भारतीय चलनापेक्षा वेगळे आहे. 1 पाकिस्तानी रुपया 0.29 भारतीय रुपयांच्या बरोबरीचा आहे. म्हणजे, पाकिस्तानमध्ये 5,99,593 रुपये भारतात 1,72,177 रुपये आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर जरी भारत आणि पाकिस्तानमध्ये iPhone 15 च्या किंमतीत फारसा फरक नसला तरी पाकिस्तानच्या नागरिकांसाठी मात्र ही किंमत खूप जास्त आहे.