नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. एक काळ असा होता जेव्हा लोक लग्नासाठी फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर असलेल्या मुलाला वधू म्हणून पसंती द्यायची. मात्र आता सगळे काही बदलत चालले आहे. देशात अनेक इंजिनिअरिंगची महाविद्यालये आहेत आणि त्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने इंजिनिअर्स बाहेर पडत असतात. यामुळेच आता त्याचा आदरही कमी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे कारण आता त्यांना पहिल्या सारखे प्राधान्य दिले जात नाही. याचाच प्रत्यय देणारा एक फोटो खूप व्हायरल होत आहे.
इंजिनिअर्सबद्दल वेगवेगळे विनोद तुम्ही वाचले आणि ऐकले असतील. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला असाच एक विनोदी फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहे. एकेकाळी लोक लग्नासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाला अधिक प्राधान्य द्यायचे पण आता इंजिनिअर मुलांना स्पष्टपणे नकार दिला जात आहे. सोशल मीडियावर लग्नाच्या जाहिरातीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लिहले, " इंजिनिअर सोडून कोणताही मुलगा वधू म्हणून चालेल." इंजिनिअर मुलांची खिल्ली उडवणारा हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे.
जाहिरात आहे की इंजिनिअर्सचा अपमान?सोशल मीडियावर नेहमी लग्नाशी संबंधित अनोख्या जाहिराती व्हायरल होत असतात. मात्र ही जाहिरात सर्वांनाच आकर्षित करणारी आहे. ज्यामध्ये एखाद्या पेशाचा किती अपमान करण्यात आला आहे हे तुम्ही पाहू शकता. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीत एक विचित्र डिस्क्लेमर लिहिले आहे. जाहिरातीत म्हटले आहे की, "गोऱ्या, सुंदर आणि श्रीमंत घरातील मुलीला IAS/IPS, उद्योगपती/व्यापारी किंवा डॉक्टर असणाऱ्या वराची गरज आहे, मात्र कृपया सॉफ्टवेअर इंजिनिअर असेल तर कॉल करू नका."