भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तुम्हाला आव्हान देणारा आहे. अनेक लोक हा फोटो पाहून गोंधळात पडले आहेत. सुशांत नंदा यांनी या फोटोमध्ये किती वाघ दिसत आहे, असा प्रश्न विचारला आहे. अनेकजणांना हे चॅलेज पूर्ण करता आलेलं नाही. तर काहींना पूर्ण सुद्धा केले आहे. सुशांत नंदा हे सतत आपल्या ट्वीटर अकाऊंटवर वन्य प्राण्यांबद्दल फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. सोबत त्याबद्दलची चांगली माहितीही देत असतात. ( हे पण वाचा-भूतानमधील घरांच्या भिंतीवर पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टचं चित्र का असतं? जाणून घ्या कारण.... )
अलीकडे त्यांनी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी रुबाबदार वाघासोबत संपूर्णपणे गवताने वेढलेल्या भागाचा फोटो ट्वीट केल आहे. यात त्यांनी म्हटलं की, 'शिकार करण्यासाठी दिशाभूल करण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला या फोटोमध्ये किती वाघ दिसत आहे?' अनेकांना वाघ सापडलेले सुद्धा नाही. अनेकांनी डोकं लढवलं पण हाती काहीच आलं नाही. काही जणांनी तर हा फोटोशॉपचा इफेक्ट आहे, असं म्हणून प्रयत्न न करताच सोडून दिलं. तुम्हाला दिसतोय का या फोटोत वाघ नक्की पहा. ( हे पण वाचा-.म्हणून त्याने बायकोला तिच्या पहिल्या पतीकडे पाठवलं, दोन पतींचा अजब-गजब करार!)