सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवीन तर कधी जुने. असाच एक जुना खतनाक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. यात तुम्ही जॅग्वार आणि अॅनाकोंडाला आपसात लढताना बघू शकता. साउथ अमेरिकेतील ग्रीन अॅनाकोंडाला जगातला सर्वात मोठा साप मानलं जातं. हा साप Boa सापाच्या परिवारातील सदस्य आहे. आता विचार करा की, जंगल विश्वतील दोन खतरनाक शिकारी अॅनाकोंडा आणि जॅग्वार आपसात भिडले. सांगू शकता का या लढाईत कोण जिंकलं असेल?
हा व्हिडीओ ट्टिटर यूजर @BiodiversideAdeB ने शेअर केलाय. त्याने कॅप्शनला लिहिले की, 'जॅग्वार-अॅनाकोंडाच्या लढाईचा दुर्मिळ व्हिडीओ'. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले असून आतापर्यंत या व्हिडीओला ७८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
या १५ सेकंदाच्या क्लिपमध्ये बघू शकता की, जगुआर विशाल अॅनाकोंडाला पाण्यातून बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत आहे. तर अॅनाकोंडा जॅग्वारला गुंडाळी मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण एका पॉइंटनंतर व्हिडीओ संपतो. त्यामुळे हे स्पष्ट होऊ शकत नाही की, या खतरनाक लढाईमध्ये जिंकतं कोण...
दरम्यान, अॅनाकोंडा जगातल्या सर्वात जड सापांपैकी एक आहे. या सापाचं वजन १३० किलोग्रॅमपेक्षाही अधिक असतं. सोबतच पाण्यात ते अधिक चपळपणे वावरतात. सहजासहजी ते कुणाचे शिकार होत नाहीत. जमिनीवर ते स्लो होतात कारण त्यांचं वजन. त्यामुळे हे साप जास्तीत जास्त नदी किंवा तलावाच्या किनाऱ्यावर आढळतात.