नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमीच कोणता-ना-कोणता व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जम्मू-काश्मीरमधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा आहे. ट्विटर आणि फेसबुकवर नेटिझन्स या कॉन्स्टेबलचे कौतुक करत आहेत. आयपीएस मुकेश सिंह यांनी या कॉन्स्टेबलाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
मुकेश सिंह यांनी या व्हिडीओ कॅप्शन दिली आहे की, 'जम्मू-काश्मीर पोलीस दलातील कॉन्स्टेबल आणि उत्साही रॅपर'. दरम्यान, या कॉन्स्टेबललविषयी माहिती जास्त काही मिळू शकली नाही. मात्र, या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल रॅप ऐकत होता, या रॅपच्या काही ओळी आहेत, 'लोग यहां सपने देखते फिरे नींद में, पर मेरे सपने तो मेरे नींद ही उड़ा गए, मेरे कंधों पर घर की जिम्मेदारी पर हिम्मत ना हारी, फिर भी मैंने रैप रखा जारी, उठा ली जिम्मेदारी तो बना सिपाही।'
या व्हिडीओला ट्विटरवर 6000 हून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर 751 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय एका ट्विटर युजर्सने म्हटले आहे की, 'तुम्ही खूप हुशार आहात, या टॅलेंटला लपवू नका.' तर दुसऱ्या एका युजर्सने कॉन्स्टेबलचे कौतुक केले आणि 'सुपर्ब' म्हटले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. प्रत्येकजण या कॉन्स्टेबलबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे.
दरम्यान, याआधी सोशल मीडियावर झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयला त्याच्या कामाबद्दल विचारले जात आहे. ज्याचे उत्तर तो हसत हसत देत आहे. डिलिव्हरी बॉयच्या या गोड स्माईलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याची स्माईल अनेकांना आवडल्यामुळे अनेकांनी त्याचा हा व्हिडीओ पाहिला आहे.