भारतातील सर्वात महागड्या विवाहांच्या यादीत अनेक नावे आहेत, परंतु 2016 मध्ये कर्नाटक सरकारमधील भाजपाचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचे लग्न कोणीच विसरू शकत नाही. जनार्दन रेड्डी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात 500 कोटी रुपये खर्च केले. वधूने 17 कोटी रुपयांची साडी आणि 90 कोटी रुपयांचे दागिने परिधान केले होते. या लग्नाची तेव्हा जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आता पुन्हा एकदा हे लग्न आणि त्यासाठी केला गेलेला खर्च चर्चेत आला आहे.
जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी हिचा विवाह 6 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. या लग्नाला सात वर्षे उलटून गेली, पण आजही हे लग्न चर्चेचा विषय आहे. लग्नासाठी 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. वधूने लग्नात 17 कोटींची महागडी साडी नेसली होती. ती कांजीवरमची शुद्ध सोन्याची जर असलेली साडी होती. वधूने परिधान केलेल्या दागिन्यांची किंमत 90 कोटी रुपये होती. असा विवाह देशात यापूर्वी कधीच झाला नसावा, असे म्हटले जाते.
ब्राह्मणी यांचा विवाह 6 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. पाहुण्यांना नेण्यासाठी 2000 कॅब आणि 15 हेलिकॉप्टर भाड्याने आणले होते. रेड्डी कुटुंबाने बंगळुरूच्या सर्व पंचतारांकित हॉटेल्समध्ये सुमारे 1500 खोल्या बुक केल्या होत्या. महागड्या लग्नात सुमारे 3000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. रेड्डी कुटुंबातील सर्व सदस्यांनी राजेशाही कपडे घातले होते.
सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने परिधान केले होते. हा विवाह सोहळा पाच दिवस चालला. वधूचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला खास मुंबईहून बोलावण्यात आले होते, जिने 6 लाख रुपये घेतले होते. वधू व्यतिरिक्त, बंगलोरमधील 50 हून अधिक सुप्रसिद्ध मेकअप कलाकारांना इतर पाहुण्यांसाठी देखील नियुक्त केले गेले होते, ज्याची किंमत 30 लाखांपेक्षा जास्त होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"