शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

नववर्षाला जपानच्या आनंदावर विरजण; अंगावर शहारे आणणारा भूकंपाचा 'VIDEO' व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 1:06 PM

भूकंप, त्सुमानीने जपान हादरलं, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.

Japan Earthquake & Tsunami Video: उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपानकडे पाहिलं जातं. पण नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला हा देश भूकंपाच्या धक्क्याने हादरला. जवळपास ७.६ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली. तसंच थोडेथोडके नाही तर तब्बल २१ वेळा हा भूकंप झाला. राजधानी टोकियो आणि कांटो या भागांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त द जपान टाइम्सने दिले आहे. एवढं कमी होतं की काय त्यात त्सुनामीने सगळं निस्तानाबूत केलं. दरम्यान, जपानमधील अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जपानच्या इशिकावा शहरातील कनाकावा रेल्वे स्थानकातील काळजाचा थरकाप उडणारा हा व्हिडीओ आहे. 

जपानमधील भूकंपातील भीषण स्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवताना रेल्वे स्थानकात घडणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद करण्यात आला आहे. भूकंपानंतर जपानमधील समुद्रकिनाऱ्यावर त्सूनामी धडकली आणि सारं काही उद्धवस्त झालं. जपानमध्ये भूकंपानं कसा हाहाकार माजवला आहे, याचा अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये भूकंपामुळे कनाकावा रेल्वे स्थानकावरील सूचना फलक अक्षरश: पाला-पाचोळ्यासारखा उडताना दिसतोय. रेल्वे स्थानकासह तेथील  सगळ्या वस्तू सहज वाऱ्याची झुळूक यावी आणि कोसळाव्यात त्या प्रमाणे हे सगळं घडतंय.दरम्यान, त्या रेल्वे स्थानकावर एक प्रवासी देखील असल्याचं पाहायला मिळतंय. या चित्तथरारक घटनेवेळी तेथे असलेला व्यक्ती प्रचंड घाबरल्याचे दिसत आहे.

जपानमधील भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक मेट्रो आणि रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. भूकंपाचे धक्के जाणवताच त्या-त्या ठिकाणावरील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केल्या आहेत. जपानमधील लोक सुरक्षित असावेत अशी आशयाची कमेंट्स देखील काहींनी केली आहे. 

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJapanजपानEarthquakeभूकंप