हा फोटो पाहून कोण म्हणेल की, हा एक माणूस आहे. फोटोत तर तुम्हाला एक तरूणी दिसत आहे. जी एक बाइक रायडर आहे. पण सत्य काही वेगळंच आहे. ही मुलगी नाही तर एक पुरूष आहे. तोही ५० वर्षांचा. गेल्या कित्येक वर्षांपासून तो लोकांना चूना लावतोय की, तो एक मुलगी आहे.
ही व्यक्ती जपानची आहे. ट्विटरवर तो @azusagakuyuki नावाने आहे. त्याला हजारो लोक फॉलो करतात. तो या पेजवर मुलगी बनून फोटो शेअर करतो.
ladbible च्या वृत्तानुसार, या फोटोंचं सत्य काही वेगळंच आहे. या फोटोत जी व्यक्ती आहे तो मुळात ५० वर्षीय पुरूष आहे. तो फोटोशॉप आणि फेस चेंजिंग अॅपच्या मदतीने आपला चेहरा बदलून लोकांसमोर फोटो शेअर करतो.
डेलीमेलनुसार, या व्यक्तीचं नाव आहे Zonggu. तो म्हणाला की, अशाप्रकारे मुलगी बनून सोशल मीडियावर फोटो शेअर करावे लागले कारण एका वयोवृद्ध व्यक्तीला कोण बघेल. ट्विटरवर त्याचे १८ हजार फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावरील त्यांच्या फॅन्सना आधीच त्यांच्यावर संशय होता. कारण अनेकदा त्यांचे पुरूषांचे फीचर्स फोटोत दिसले होते. त्यांच्या हातावरही अनेकांची नजर गेली होती. कारण त्यांच्या हातावर खूप केस होते. जे सामान्यपणे मुलींच्या हातांवर नसतात.
सोशल मीडियावर जसा याचा खुलासा झाला तसे यूजर्स कमेंट करू लागले. काही महिलांनी तर त्यांचं खूप कौतक केलं. त्या अनेक लोकांनी त्यांच्या कामाचंही कौतक केलं. तर काही लोक म्हणाले की, म्हणून ते सोशल मीडियावर विश्वास ठेवत नाहीत.