तुम्ही चोरीच्या बातम्या अनेक वाचल्या असतील. यात कधी चोरांनी पैशावर, दागिण्यांवर डल्ला मारल्याचे पाहिले असेल. सध्या मध्यप्रदेशमधून एक वेगळीच वस्तु चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील ही घटना आहे.
येथील एका पिंपळाच्या झाडाखाली असलेले शिवलिंग आणि नंदी चोरीला गेले असल्याचे समोर आले. हे शिवलिंग गेल्या २० वर्षापासून या झाडाखाली होते, परिसरातील नागिरक या शिवलिंगाची पूजा करत होते. दरम्यान, अचानक हे शिवलिंग गायब झाल्यामुळे गोंधल उडाला आहे. हे प्रकरण आता पोलिसात पोहोचले आहे.
Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर मद्यप्राशन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी
रायपुरियाच्या झाबुआ चौकातील ही घटना आहे. येथे अमृत मेडा नावाच्या व्यक्तीने चहाचे दुकान थाटले. दररोज येथील शिवलिंगाची पूजा करूनच तो आपला व्यवसाय सुरू करतो. नेहमीप्रमाणे देवाच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजून ३० वाजता अमृत मेडा येथे पोहोचले तेव्हा तेथून शिवलिंग व नंदी गायब होते. त्यांनी आजूबाजूला शोध घेऊन पोलिसांना माहिती दिली. स्टेशन प्रभारी राजकुमार कानसुरिया आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि लोकांची चौकशी करत आहेत.
देवाची चोरी कशी होऊ शकते याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. आता चोर या देवांचे काय करणार. शिवलिंग सोन्याचे, चांदीचे किंवा धातूचे असते तर ती चोरी समजली असती, पण दगडी शिवलिंगाचे कोणी काय करणार. झाबुआ चौकात या पिंपळाच्या झाडाखाली २० वर्षांपूर्वी शिवलिंग आणि नंदीची स्थापना झाल्याचे सांगितले जाते.