देशातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं गेलं असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांना आपले दैनंदिन काम करण्यातही अडचणी येत आहेत. अनेक लोकांना आपली घरे सोडून जावी लागली आहेत. तर काही घरात पाणी शिरल्याने घराच्या छतावर राहत आहेत. अनेक ठिकाणी तर इतकं पाणी वाहत आहे की, लोकांच्या गाड्याही वाहून गेल्या.
अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तेलंगानातील राजन्ना सिरिसिल्ला जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. इथे शांतीनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे आणि सोबतच पाण्याचा वेगही जास्त आहे. अशात एका व्यक्तीने आपली कार वाहून जाऊ नये म्हणून जबरदस्त जुगाड केला आहे. त्याने त्याची कार दोरांच्या मदतीने अनोख्या पद्धतीने बांधून ठेवली आहे. जेणेकरून कार वाहून जाऊ नये. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे पण बघा : VIDEO : खतरनाक! मंदिरात झोपलेल्या तरूणाच्या अंथरूणात शिरला साप आणि मग....)
लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत आणि या व्यक्तीच्या जुगाडाचं भरभरून कौतुक करत आहेत. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत एका यूजरने लिहिलं की, 'आता सिरिसिल्ला या जुगाडामुळे प्रसिद्ध झालं. पहिल्यांदा सिरिसिल्लामध्ये एका कार मालकाने आपल्या कारला अशाप्रकारे दोराने बांधलं'.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, रस्त्यावर पाणी भरलं आहे आणि पाण्याचा वेगही जास्त आहे. ज्यात एक कार अर्धी बुडालेली दिसत आहे. तेच एक व्यक्ती छतावर उभा आहे आणि कारच्या पुढच्या-मागच्या बाजूला दोराने बांधून तो दोर छताच्या खांबाला बांधला आहे.