Chhota Bheem हे कार्टुन भारतीयांच्या घराघरात लोकप्रिय आहे... त्यातील प्रत्येक पात्र हे लहान मुलांच्या आवडीचे आहेत. त्यामुळेच त्या पात्रांची नावं घरातील सदस्यांनाही मुलं देताना पाहायला मिळतात. पण, मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर #JusticeForChutki हा ट्रेंड होत आहे आणि त्यामुळे वेगळ्याच कारणामुळे 'छोटा भीम'ची चर्चा होताना दिसत आहे. पण, अचानक चुटकीसाठी नेटिझन्स न्याय का मागत आहेत आणि निर्म्यात्यांना त्यावर खुलासा का करावा लागला?
छोटा भीम या कार्टुन मालिकेत भीमसह, राजू, चुटकी, जग्गू, कालिया, ढोलू-बोलू या मित्रांसह राजकुमारी इंदूमती हे पात्र दाखवण्यात आले आहेत. भीम आणि चुटकी यांच्यात घट्ट मैत्री दाखवण्यात आली आहे. हा मित्रपरिवार त्यांच्या ढोलकपूर गावाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे दाखवण्यात आले आहे. यात चुटकीची आई टुणटुण मौसी यांच्या हातचे लाडू हे भीमच्या शक्तीमागचं रहस्य आहे. त्यामुळे भीमसाठी चुटकी नेहमी लाडू घेऊन येते.
पण, हा भीम ढोलकपूरचे राजाच्या मुलीशी इंदुमतीशी लग्न करणार असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले आणि त्यांनी चुकटीला न्याय द्या ही मोहिम सुरू केली. त्यावरून अनेक मीम्सही व्हायरल झाले. अखेर निर्मात्यांना त्यावर खुलासा करावा लागला. भीम आणि इंदूमती यांचे लग्न होणार नसल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले. लहान मुलांच्या कार्यक्रमात प्रेम आणि लग्न असे काही दाखवण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य
आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!
Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!
वसीम अक्रमच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला शेवटचं स्थान!
चला निसर्ग जगवूया, मनाची बंद कवाडं उघडूया; रोहित शर्माची भावनिक साद
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सर्वोत्तम वन डे संघातून रोहित शर्माला वगळले!
पोलिसांत FIR दाखल झाल्यानंतर अखेर युवराज सिंगनं मागितली माफी
3 महिन्यांच्या भुकेल्या मुलीसाठी रेल्वे पोलिसानं लावली जीवाची बाजी; होतेय उसेन बोल्टशी तुलना