भारत आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांमधील वादंग संपूर्ण जगाला माहीत आहे. कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २१ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये १९७२ मध्ये झालेलं दुसरं युद्धही भारतानं जिंकलं होतं. पण दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचं शेपूट वाकडंच आहे. या निमित्ताने देशभरात शहीद जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. तसेच यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रयागराजच्या वाळू शिल्पकाराने २१ व्या कारगिल विजय दिवसाबद्दल सैनिकांना श्रध्दांजली देण्यासाठी वाळूवर शिल्प साकारले आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोकांनी या फोटोला प्रचंड पसंती दिली आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता. शहिद जवानांनाचे अत्यंत लक्षवेधी असे शिल्प वाळूवर काढले आहे. या फोटोला आतापर्यंत ४७७ पेक्षा जास्त रिट्वीट्स आणि ४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर युजर्सनी जय हिंद अशा कमेंट्स दिल्या आहेत.
१९९९ मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता. जम्मू-काश्मीरमधील कारगिल, द्रास आणि बटालिक या विभागात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहीम राबून शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी आतापर्यंत त्यांचे सगळे कट उधळून लावलेत. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे 'ऑपरेशन बद्र'.
अणुचाचणीच्या मुद्द्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावं, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षऱ्या केल्या. लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या सैनिकांना आणि त्यांच्या आडून दहशतवाद्यांना लपूनछपून नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास त्यांनी सुरुवात केली. हेच होतं, 'ऑपरेशन बद्र'. काश्मीर आणि लडाखला जोडणारा मार्ग तोडून भारतीय जवानांना सियाचीनमधून हटवण्याचं कारस्थान त्यांनी रचलं होतं.
कारण या भागात तणाव निर्माण झाल्यास काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि भारतावर दबाव वाढवता येईल, असं पाकिस्तान समजत होता. युद्धात २६ जुलै १९९९ च्या दिवशी शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला आणि भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानानं तिरंगा फडकवला. भारतीय लष्कराचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले.
कोरोनानंतर आता 'या' देशात नवीन संकट; ६०० लोकांना झाली आजाराची लागण
काळजी वाढली! कोरोना संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही पाठ सोडणार नाहीत 'या' समस्या