अरेरे! आई-वडील दोघांचाही अपघात झाला; अन् चिमुरड्याला कडेवर घेऊन बाहेर खेळवत होता होमगार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 07:16 PM2021-03-11T19:16:42+5:302021-03-11T19:24:33+5:30

Trending Viral Video in Marathi : सोशल मीडियावर या होम गार्डचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता  एका चिमुकल्याला खेळवताना हा माणूस दिसून येत आहे.

keral home guard kept takecare the infant outside the hospital after parents injured in an accident see video | अरेरे! आई-वडील दोघांचाही अपघात झाला; अन् चिमुरड्याला कडेवर घेऊन बाहेर खेळवत होता होमगार्ड

अरेरे! आई-वडील दोघांचाही अपघात झाला; अन् चिमुरड्याला कडेवर घेऊन बाहेर खेळवत होता होमगार्ड

Next

केरळच्या रुग्णालयातील एका होमगार्डनं सगळ्यांचेच मन  जिंकले आहे. सोशल मीडियावर या होम गार्डचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता  एका चिमुकल्याला खेळवताना हा माणूस दिसून येत आहे. या होम गार्डचे नाव के, एस सुरेश (K S Suresh) आहे. हा व्हिडीओ केरळपोलिसांनी  (Kerala Police)  आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार रस्त्यावरील अपघातादरम्यान या ७ महिन्यांच्या चिमुरडीच्या पालकांना गंभीर दुखापत झाली. सुदैवानं या चिमुकलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. या  चिमुरडीचे नातेवाईक जखमी झाले असून मोठ्या बहिणीनं या चिमुकल्याचा जीव वाचवला आहे.

या चिमुकल्याचे संपूर्ण कुटुंब आपल्या घरी कयामकुलम (Kayamkulam)  येथे जात होते. त्यावेळेला त्याची कार एका ट्रकला धडकली आणि या दुर्घनेत मोठ्या बहिणीचा मृत्यूही झाला. या घटनेत ५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

चिमुरडी सतत रडत होती त्यावेळी ऑनड्यूटी  तैनात असलेल्या होम गार्डनं तिनं कडेवर घेतलं आणि इकडे तिकडे फिरवायला घेऊन गेले. जेणेकरून या चिमुरडीचं रडणं बंद होईल. सध्या या माणसाचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोनं लोकांचं मन जिंकलं आहे. Woman forest officer dances: आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ

Web Title: keral home guard kept takecare the infant outside the hospital after parents injured in an accident see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.