Farmer with Audi: सोशल मीडियावर 'फार्मर विथ ऑडी' म्हणून एक व्यक्ती लोकप्रिय झाली आहे. वास्तविक, केरळचा रहिवासी असलेला सुजीत त्याच्या आलिशान कार Audi A4 मध्ये रस्त्याच्या कडेला भाजी विकण्यासाठी पोहोचतो. जेव्हा लोकांनी त्याचा व्हिडिओ पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. कारण देशातील बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था फारच हालाखीची असल्याचे दिसून येते. अशा वेळी या व्हायरल रीलमध्ये, शेतकरी लाल पालकाचे ताजे पीक गोळा करताना आणि नंतर त्याच्या आलिशान कार ऑडीमध्ये स्टॉक विकण्यासाठी बाजारात जाताना दिसतो. बाजारात पोहोचल्यावर तो जमिनीवर एक चटई पसरून त्यावर ताज्या कापलेल्या लाल पालकाचे वाटे लावून विक्री करतो.
इंस्टाग्राम बायोनुसार, सुजीतने सुमारे 10 वर्षांपूर्वी शेती करण्यास सुरुवात केली. तो शेतीशी संबंधित व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट करतो. त्याला या प्लॅटफॉर्मवर दोन लाखांहून अधिक वापरकर्ते फॉलो करतात. एकूणच तो सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. हा व्हिडिओ 25 सप्टेंबर रोजी @variety_farmer इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - जेव्हा मी भाजी विकण्यासाठी ऑडी घेऊन पोहोचतो. या क्लिपला चार दिवसांत 4 लाख 38 हजार व्ह्यूज आणि अंदाजे 80 लाख लाइक मिळाले आहेत. तसेच दोन हजारांहून अधिक युजर्सनी कमेंट केली आहे. अनेक वापरकर्ते म्हणाले की हा भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी, तर काहींनी सांगितले की असं बनायची माझी इच्छा आहे! सर्व भारतीय शेतकऱ्यांना असे यश मिळो. तर इतर वापरकर्ते म्हणाले की तुम्ही असा व्यवसाय करा.