नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावरकेरळचेमंत्री आर बिंदू खूप चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या दानाच्या कार्यामुळे प्रत्येकजण त्यांचे कौतुक करत आहे. केरळ राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आर बिंदू यांनी समाजाला माणुसकीचे एक चांगले उदाहरण दिलं आहे. बिंदू यांनी एका रूग्णालयाला भेट दिली असता तेथील एका रूग्णाकडे किडनी प्रत्यार्पण करण्यासाठी पैसे नव्हते असे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब समजताच बिंदू यांनी संबंधित रूग्णाला मदत देण्याचे ठरवले आणि त्यांनी तिथेच आपल्या हातात असलेले सोन्याचे ब्रेसलेट काढून रूग्णाला दिले ज्यामुळे तो आपला उपचाराचा खर्च भागवू शकेल.
दरम्यान, केरळचे उच्च शिक्षणमंत्री एका बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. तिथे त्यांची भेट एका २७ वर्षीय रूग्णासोबत झाली जो आर्थिक समस्येचा सामना करत होता. त्याच्याकडे आपली किडनी प्रत्यार्पणासाठी देखील पैसे नव्हते, हे समजताच मंत्री बिंदू यांनी पैसे न देता आपल्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट रूग्णाला दान केले. या सर्व प्रकाराची सर्वत्र चर्चा रंगली असून प्रत्येकजण मंत्र्याच्या दानशूरपणाचा चाहता झाला आहे.
मंत्र्याने जिंकली मनं सोशल मीडियावर ही घटना खूप व्हायरल होत आहे. याप्रकरणाची ज्यांना ज्यांना माहिती होत आहे ती सर्वमंडळी मंत्री साहेबांची प्रशंसा करत आहे. मंत्री असावा तर असा अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. तर मदत छोटी असो की मोठी त्याला महत्त्व नसून मदतीला महत्त्व असल्याचे सोशल मीडियावरील युजर्स म्हणत आहेत. केरळ राज्याचे उच्च शिक्षणमंत्री बिंदू यांनी आपल्या या कृत्याने अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी दाखवलेल्या माणुसकीतून इतर राजकारण्यांना एक धडा देण्याचे काम केले आहे. जनतेचा सेवक कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे रूग्णालयातील काही रूग्णांनी सांगितले. सर्वच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नसतात, अनेक मंत्री आपल्या पदाचा योग्य वापर करून जनतेच्या मनात जागा निर्माण करतात याचे हे ताजे उदाहरण आहे.