अनेकजण खूप मेहनतीनं कष्ट करून गरिबीतून वर येतात. अशात झटपट श्रींमत होण्यााचा किंवा मोठी रक्कम कमी वेळात कशी मिळवता येईल या विचारात अनेकजण असतात. जर समजा लॉटरी लागली किंवा कष्टानं न कमावलेले पैसै हाती लागले तर रातोरात लोक श्रीमंत होतात. तुम्ही आतापर्यंत अशी अनेक उदाहरणं सिनेमात पाहिली असतील. खूप कमी लोक इमानदारीनं आपलं काम करून पैसै मिळवतात . आज आम्ही तुम्हाला अशाच एका माणसाबद्दल सांगणार आहोत.
कोच्चीमधील नेव्हलशिपयार्डमध्ये काम करणारे सुधाकरन हे गृहस्थ आहेत. या घटनेवरून तुम्हाला इमानदारी आणि माणूसकी अजूनही जीवंत असल्याचा प्रत्यय नक्की येईल. कोच्चीमध्ये सुधाकरन हे एनएआरव्हायआरमध्ये काम करतात. २६ ऑगस्टला त्यांना रस्त्यावर एक पाकिट सापडलं. या पाकिटात तब्बल ६५ हजार रुपये कॅश होती.
एव्हढी मोठी रक्कम पाहून एखादा माणूस खूष झाला असता आणि हे पैसे त्यानं स्वतःसाठी वापरले असते. पण सुधाकरन यांनी असं न करता हे पैसे पोलिस स्थानकात जमा केले आहेत. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार २६ ऑगस्टला कामावरून घरी येत असताना सुधाकरन यांना पैश्यांनी भरलेलं पाकिट रस्त्यावर सापडलं.
पाकिट सापडल्यानंतर ते लगेचच पानगड पोलिस स्थानकात गेले आणि हे पाकिट पोलिसांच्या ताब्यात दिलं. सुधाकरन यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडिया युजर्स सुधाकरन यांनी दाखवलेल्या इमानदारीबद्दल त्यांचे कौतुक करत आहेत. अनेकांना सुधाकरन यांच्या वागण्यावरून प्रेरणा मिळाली आहे. कारण समाजात सुधाकरन यांच्यासारखी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात.
हे पण वाचा-
लय भारी! स्वतःचे दागिने विकून 'ती'नं जिम उघडली; अन् काही दिवसात जगप्रसिद्ध झाली, थक्क करणारा प्रवास
लय भारी! जगातील सर्वात वेगवानं भारताचं 'ह्यूमन कॅल्क्युलेटर '; २० वर्षीय नीलकंठने पटकावलं सुवर्णपदक