कौतुकास्पद! फक्त एका विद्यार्थिनीसाठी केरळ सरकारने चालवली ७० आसनी ‘स्पेशल बोट’, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 11:49 AM2020-06-03T11:49:36+5:302020-06-03T11:52:54+5:30

१७ वर्षीय सैंड्रा बाबू या विद्यार्थिनीसाठी शुक्रवार आणि शनिवार ११ वी ची परीक्षा देण्यासाठी ही बोट चालवण्यात आली.

Kerala plies 70-seater boat to ferry marooned girl to exam hall pnm | कौतुकास्पद! फक्त एका विद्यार्थिनीसाठी केरळ सरकारने चालवली ७० आसनी ‘स्पेशल बोट’, कारण...

कौतुकास्पद! फक्त एका विद्यार्थिनीसाठी केरळ सरकारने चालवली ७० आसनी ‘स्पेशल बोट’, कारण...

Next
ठळक मुद्देशाळेत जाण्यासाठी फक्त जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध लॉकडाऊनमुळे फेरीबोट बंद असल्याने विद्यार्थिनीला परीक्षेला जाण्यास अडचणसरकारने तात्काळ एका मुलीसाठी स्पेशल बोटीची केली व्यवस्था

आलापूझा – सध्या देशात सगळीकडे कोरोना व्हायरसमुळे दहशतीचं वातावरण आहे, लॉकडाऊन असल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. केरळमध्ये अशी एक घटना समोर आली आहे ती ऐकून तुम्हालाही कौतुकास्पद वाटेल. एका मुलीला परीक्षा देता यावी यासाठी केरळ राज्य जल वाहतूक विभागाने ७० आसनी बोट फक्त तिच्या एकटीसाठी सुरु केली.

याठिकाणी राहणारी १७ वर्षीय सैंड्रा बाबू या विद्यार्थिनीसाठी शुक्रवार आणि शनिवार ११ वी ची परीक्षा देण्यासाठी ही बोट चालवण्यात आली. आलापूझा जिल्ह्यातील एमएन ब्लॉकपासून कोट्टायम जिल्ह्याच्या कांजीरामपर्यंत एकमेव जल वाहतुकीचा पर्याय आहे. कुट्टनाद परिसरात प्रवासी नौकेवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून बंदी लावण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर एचएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यावेळी आपल्याला ही परीक्षा द्यायला मिळेल की नाही याची चिंता सैंड्रा बाबूला लागली होती.

याबाबत सैंड्राने सांगितले की, माझी परीक्षा चुकेल असं मला वाटत होतं. शाळेत पोहचण्यासाठी आमच्याकडे दुसरं कोणतंही साधन नव्हतं. त्यानंतर केरळच्या एसडब्ल्यूटीडीशी संपर्क साधला. त्यांनी माझी अडचण समजून घेतली. माझी समस्या ऐकल्यानंतर त्यांनी मला बोट पाठवण्याची व्यवस्था केली, मी एका मजुराची मुलगी असून माझ्यासाठी सरकारने ही व्यवस्था केल्याने मला गर्व आहे असं ती म्हणाली.

बोटीतील इतर ५ कर्मचाऱ्यांसोबत सैंड्रा बाबू एकटी प्रवासी होती, सकाळी ११.३० वाजता सैंड्राला तिच्या गावातून पिकअप केल्यानंतर १२ वाजता तिला शाळेत सोडण्यात आलं. त्यानंतर सैंड्राची परीक्षा संपेपर्यंत ती बोट तिची वाट पाहत होती. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता तिला पुन्हा घरी सोडण्यात आलं. २ दिवस या बोटीचा दिनक्रम असाच होता.

यावर एसडब्ल्यूटीडीचे संचालक शाजी नायर यांनी सांगितले की, या बोटीच्या प्रवासाठी एकावेळी कमीत कमी ४ हजार रुपये खर्च येतो, मात्र सैंड्राकडून फक्त १८ रुपये प्रवासासाठी घेण्यात आले. सैंड्रा यांनी आमच्याशी संपर्क साधला असता आम्ही तिची मदत करण्यासाठी एकाही सेकंदाचा विचार न करता तात्काळ तिला परीक्षेला जाण्यासाठी व्यवस्था केली. मात्र केरळच्या सरकारच्या या कामामुळे अनेक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Nisarga Live Updates: 'निसर्ग' चक्रीवादळाचा वेग वाढला, एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता

निसर्ग' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम सज्ज

 हजारोंच्या गर्दीतही कोरोना संक्रमित रुग्ण शोधणार; भारतीय विद्यार्थ्यांनी बनवला ‘असा’ अविष्कार!

लॉकडाऊनमध्ये अडकले हिंदू नवरीचं कुटुंब; मुस्लीम कुटुंबाने कन्यादान करत पार पाडलं लग्न

कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; ‘या’ देशात रक्त पिणाऱ्या किड्यांचा हल्ला!

Web Title: Kerala plies 70-seater boat to ferry marooned girl to exam hall pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.