ketchup challenge : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेंड सुरू असतात. सध्या एक ट्रेंड चर्चेत आला आहे. ज्यात महिला केचअपच्या मदतीने आपलं रिलेशनशिप किती मजबूत आहे याची माहिती मिळवतात. याला 'ketchup challenge' चॅलेंज असं नाव देण्यात आलं आहे. या चॅलेंजद्वारे महिला आपल्या किचनमध्ये केचअप सांडवतात आणि मग आपल्या पार्टनरला ते साफ करण्यास सांगतात. इतकंच हे चॅलेंज आहे. तसं हे चॅलेंज फार सोपं वाटतं. लोकांना वाटतं की, हे काय चॅलेंज आहे?
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, एका महिलेने टिकटॉकवर याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती केचअप सांडवताना दिसत आहे आणि मग आपल्या बॉयफ्रेंडला ते साफ करण्यास सांगते. ती म्हणाली की, याचा रिझल्ट बघून तिला आनंद झाला. तिच्या बॉयफ्रेंडने पेपर टॉवेलने ते साफ केलं. पण ते करत असताना त्याने एक चुकही केली. त्याने जमिनीवर क्लीनर स्प्रे केला. पण तो क्लीनर स्प्रे केवळ लाकडावर वापरण्यासाठी होता. तरीही महिला त्याच्या कामावर खूश झाली.
एका दुसऱ्या महिलेनेही एक व्हिडीओ पोस्ट केला. पण तिच्या बॉयफ्रेंडने चांगली सफाई केली नाही. त्याने किचन आणखी जास्त खराब केलं. तो नॅपकिनला गोल गोल फिरवून सफाई करत होता. ही पद्धत अनेकांना आवडली नाही. लोकांनी खिल्ली उडवत म्हटलं की, तो तर केचअपने पॉलिश करत आहे. एका यूजरने महिलेला असंही म्हटलं की, तू त्याला सोडून दे.
महिलांचं मत आहे की, त्या याद्वारे केवळ हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, त्यांचा पार्टनर त्यांच्या सांगण्यावरून सफाई करतो किंवा नाही. जर बरोबर करत असेल तर ठीक आहे. जर बरोबर सफाई करत नसेल तर याचा अर्थ त्याला घरातील एक साधं कामही येत नाही.