मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. बऱ्याच आपण आपल्याच चुकांमुळे मृत्यूला आमंत्रण देतो. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला भरधाव ट्रेन समोरून येत असतानाही रेल्वे क्रॉस करायला गेली. एकदा नव्हे तर दोन वेळा तिने रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा कसाबसा तिचा जीव वाचला तरी दुसऱ्यांदा तिने पुन्हा रिस्क घेतली. व्हिडीओचा शेवट धडकी भरवणारा आहे.
रेल्वे ट्रॅक क्रॉस करू नये, असं वारंवार सांगितलं जात असतानाही काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. वेळ वाचवण्यासाठी किंवा काही पैसे वाचवण्यासाठी अनमोल असा जीव धोक्यात टाकतात. असाच हा व्हिडीओ आहे, ज्यात काही लोकांनी आपला वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला.
व्हिडीओत पाहू शकता ट्रेन मध्येच थांबली आहे. त्यावेळी तिथं जवळच राहणारे लोक त्या ट्रेनमधून उतरले आणि ट्रॅक क्रॉस करू लागले. बरेच लोक आहेत, त्यांचं सामान त्यांच्यासोबत आहेत. ट्रेनमधीलच एका व्यक्तीने या सर्वांचा व्हिडीओ शूट केला. त्यात भयानक दृश्य कैद झालं.
जेव्हा हे लोक रेल्वे ट्रॅक क्रॉस करायला गेले तेव्हाच समोरून भरधाव ट्रेन येत होती. एका व्यक्ती या व्हिडीओत ट्रेन येत असल्याचं त्यांना सांगतानाही दिसतो. तरी हे लोक सामान घेऊन ट्रॅकवरून जातात. सुदैवाने सर्वजण ट्रेन यायच्या आधी पलीकडे पोहोचतात. पण एक महिला मात्र ट्रॅकवरच असते. ट्रकवरच उभं राहून ती सामान दुसऱ्या बाजूला फेकते आणि स्वतः पुन्हा मागे येते. त्यावेळी ट्रेन तिच्यापासून काही अंतरावरच असते.
त्याचवेळी आपल्या हृदयाची धडधड वाढते. ट्रेन इतकी वेगात येत असते की या महिलेचं काही खरं नाही असंच वाटतं. सुदैवाने ट्रेन तिला धडकायला आणि ती रेल्वे पटरीवरून बाहेर पडायला. अवघ्या काही सेकंदामुळे ती मृत्यूच्या दारातून परत येतो. तिचा आणि मृत्यूचा सामना जवळपास झालाच होता.
ट्रेन येत असताना पटरी क्रॉस करण्याचा मूर्खपणा सर्वांनी केलाच पण या महिलेने तर पुन्हा मागे येण्याची अति मूर्खपणा केला. थोडा सेकंद उशीर झाला असता तर ट्रेन तिच्या चिथड्या उडवल्या असत्या. पण तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती इतक्या मोठ्या दुर्घटनेतून बचावली.
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. आयएफएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'आयुष्य तुमचं, निर्णय तुमचा' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.