सध्या सूर्य चांगलाच तापत असून उन्हामुळे मनुष्यप्राणीच नाही तर इतर प्राणीही हैराण झाले आहेत. दरम्यान सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यात एक तरूण कोब्रा सापाला बकेटीत पाणी घेऊन आंघोळ घालतो आहे. बरं यात कोब्राही आरामात फणा काढून बसला आहे.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी त्याला कॅप्शन दिलं आहे की, इतक्या उकाड्यात आंघोळ करणं कुणाला आवडणार नाही. तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न करू नका, हे धोकादायक ठरू शकतं'.
व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, उकाड्यामुळे हैराण झालेल्या कोब्रा सापावर पाणी टाकत आहे. इतकेच नाही तर त्याने कोब्रा सापाला अनेकदा हातही लावलाय. पण त्याने हल्ला केला नाही. तो शांतपणे पाण्याचा आनंद घेतो आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक वन अधिकारी एका कोब्रा सापाला हाताने पाणी पाजत होता. हा व्हिडीओ आएएस अधिकारी अवनीश सरन यांनी शेअर केला होता. हा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.