King Cobra Snake Viral Video: सापाचे नाव ऐकताच लोकांच्या अंगावर काटा येतो. किंग कोब्रा दिसला तर अनेकांची हवा टाईट होते. जंगलातील सर्वात धोकादायक आणि भयावह साप म्हणून किंग कोब्रा ओळखला जातो. किंग कोब्रा साप हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. किंग कोब्राचे खाद्य म्हणजे इतर साप. अत्यंत विषारी किंग कोब्राचा दंश अत्यंत धोकादायक मानला जातो. किंग कोब्रा कधीही स्वत:हून मानवावर हल्ला करत नाही, पण मानवानेच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर मात्र तो दंश मारल्याशिवाय राहत नाही. सध्या किंग कोब्राचा एक भयावह व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
किंग कोब्राचा व्हिडिओ पाहून लोक घाबरले!
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ण वाढ झालेल्या किंग कोब्राची लांबी १९ फूटांपर्यंत असू शकते. असे म्हटले जाते की प्रौढ किंग कोब्रा सरासरी १३ फूट लांबीचा असतो आणि त्याचे वजन ६ किलोपर्यंत असू शकते. सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये १८ फूट लांब किंग कोब्रा दिसत आहे. व्हिडीओ ज्यांनी पाहिला त्यांना तर धडकी भरली असेलच. कारण किंग कोब्रा सहसा जमिनीवर सरपटत असतो, परंतु या व्हिडिओमध्ये किंग कोब्रा सुमारे ३ ते ४ फूट उंचीवर उभा होता. त्यामुळेच हा व्हिडीओ पाहून अनेकांची खरंच दांडी गुल झाली.
व्हिडिओ पाहून लोकांनी दिल्या विचित्र प्रतिक्रिया
सापांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच दहशत निर्माण करतात. हे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसताच व्हायरल होतात. या व्हिडिओलाही अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. यूट्यूबवर आतापर्यंत एक लाख 71 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ थोडा जुना आहे पण तो पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, तो किंग कोब्रा असू शकत नाही, असेही काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितले. फक्त ब्लॅक मांबासारखे रॅटलस्नेक जमिनीवर कित्येक फूट उंच उभे राहू शकतात. एका व्यक्तीने सांगितले की, "व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीलाही सापाला पाहून थरथर कापला असेल."